Monday, March 24, 2025
Homeजळगाव१५ गावांच्या ग्रामस्थाच्या हक्का साठी दिपनगर येथे शिव सेना ठाकरे गटाचे आंदोलन

१५ गावांच्या ग्रामस्थाच्या हक्का साठी दिपनगर येथे शिव सेना ठाकरे गटाचे आंदोलन

१५ गावांच्या ग्रामस्थाच्या हक्का साठी दिपनगर येथे शिव सेना ठाकरे गटाचे आंदोलन

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आज दिनांक 13/2/2025 पासुन दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प ग्रस्त 15 गावांमधील गावकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेणे साठी भुसावळ तालुका उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दिपक सिंग राजपूत साहेब,, तालुका प्रमूख निलेश महाजन यांच्या उपस्थितीत दीपनगर येथील 660 M V प्रकलापाच्या मेन गेट समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे .
जोपर्यंत या नागरिकांना न्याय मिळणार नाही तोवर हे आंदोलनं सुरूच राहील व ठेकेदार, व राजकारण्यांची मुजोरी चालू देणारं नाहित अश्या अश्याचा इशारा तालुका प्रमूख निलेश महाजन यांनी दिलेला आहे
वेळोवेळी निवेदन देवूनही दिपनगर प्रशासन दखल घेत नसल्याने हे आंदोलन आहे .
या प्रसंगी भुसावळ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी रहीम भाई गवळी,, शरद जोहरे,, शरद जयस्वाल, योगेश बागुल,, राजेश महाजन,, गणेश पाटील व आदी शिवसैनिक तसेच प्रकल्प ग्रस्त गावांमधील बेरोजगार तरुण मोठया संख्येनं उपास्थित आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या