Sunday, April 27, 2025
Homeजळगावअवकाळी पाऊसात वीज कोसळून नातू ठार तर आजोबा गंभीर !

अवकाळी पाऊसात वीज कोसळून नातू ठार तर आजोबा गंभीर !

अवकाळी पाऊसात वीज कोसळून नातू ठार तर आजोबा गंभीर !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील धानवड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊन वीज कोसळून अंकुश विलास राठोड (१५, रा. धानवड, ता. जळगाव) या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे आजोबा शिवाजी जगराम राठोड (६५) हे भाजले जाऊन गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, अंकुश राठोड हा मुलगा आजोबा शिवाजी राठोड यांच्यासह नेहमीप्रमाणे शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक विजांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात तीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा शिवाजी राठोड हे भाजले गेले. ही घटना आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी राठोड यांच्या कुटुंबियांना माहिती दिली.या घटनेनंतर नागरिकांनी अंकुश राठोड व आजोबा शिवाजी राठोड या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता तर गंभीर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत मोठ्या प्रमाणात भाकोश केला

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या