तरुणाने महिलेला ढकलले शेत विहिरीत ; गुन्हा दाखल!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील चुंचाळे या गावाजवळ शेत विहिरीत ३२ वर्षीय महिलेस एका तरुणाने ढकलून तो तेथून फरार झाला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. महिलेला विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व तिच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात सलमान पठाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बऱ्हाणपूर येथील ही महिला सलमान पठाण (रा. पातोंडा, ता. लालबाग) याच्यासोबत रविवारी मनुदेवी दर्शनाकरिता आली होती. दुपारी १ वाजता ते शेतात नाष्टा करत होते.
नाष्टा झाल्यानंतर या तरुणाने महिलेला विहिरीत किती खोल पाणी आहे, हे पाहण्यास सांगितले. ती विहिरीत डोकावत असताना तिला त्याने विहिरीत ढकलून दिले.