Sunday, April 27, 2025
Homeजळगावपोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.

पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.

वाईट संगत पासून दूर राहा :
पो.नि.प्रदीप ठाकूर.

पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.

यावल दि.७  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगरपरिषद संचलित
साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात
दि.६ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त यावल पोलिस स्टेशनचे पो.नि.प्रदीप ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना विविध नियम, मोबाईलचा योग्य वापर,विद्यार्थी संगत,वाईट संगत पासून लांब रहा,चांगल्या सवयी,सायबर क्राईम, परीक्षेत कॉपी करू नका,मेहनतीने अभ्यास करा, मोबाईल गेम खेळू नका,चांगली पुस्तके वाचन करा,वर्तमान-पत्र वाचन करा, मोठ्या व्यक्तींचा आदर करा, विविध आधुनिक शस्त्रांविषयी माहिती,ट्राफीक नियम इ.विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर,
उपप्राचार्य ए.एस. इंगळे सर,
पर्यवेक्षक व्हीं.ए.काटकर सर, व्हीं.टी.नन्नवरे सर,ज्येष्ठ शिक्षक डी. एस.फेगडे सर,पी.एन.सोनवणे सर,कार्यालयीन अधीक्षक एन.के.
बारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक व्ही.टी.नन्नवरे सर यांनी केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले,विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डी.एस.फेगडे सर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षिका,
शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सर्वांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या