फैजपुर नगर परिषद तर्फे पत्रकार दिन साजरा
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
फैजपुर नगरपरिषदेच्या वतीने यावर्षी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांच्या हस्ते पत्रकार बांधवांना गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बबनराव काकडे हे होते. फैजपुर नगर परिषदेचे प्रभारी मुख्य अधिकारी समीर शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले
फैजपूर शहरातील सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. त्यात वासुदेव सरोदे, उमाकांत पाटील सर, राजेंद्र तायडेसर, संजय सराफ, समीर तडवी, सलीम पिंजारी, मलक शकीर, राजू तडवी, ईदू पिंजारी, कामिल शेख, इनुस पिंजारी या पत्रकार बांधवांना फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी बबनराव काकडे तसेच फैजपुर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी समीर शेख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रथम पत्रकारांच्या वतीने प्रा. उमाकांत पाटील, प्रा. राजेंद्र तायडे, संजय सराफ यांनी मनोगतातून नगरपरिषदेने समाज हिताचे निर्णय तात्काळ घ्यावे व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. आपण निर्भीडपणे काम करा. त्यासाठी आम्ही सर्व पत्रकार आपल्या सोबत आहेत असे सांगितले. प्रभारी मुख्य अधिकारी समीर शेख तसेच प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरपरिषदेचे माधव कुटे, संगीता बॉक्षे मॅडम तसेच पत्रकारांच्या वतीने प्रा. उमाकांत पाटील, प्रा. राजेंद्र तायडे, संजय सराफ यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचें सूत्रसंचालन नगर पालिकेचे ठाकरे साहेब यांनी केले तर आभार प्रवीण सपकाळे यांनी मानले.