बापरे : तरुणीने केला अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रावेर शहरातील अल्पवयीन मुलाचा नात्यातीलच एका २५ वर्षांच्या युवतीने लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या युवतीने अल्पवयीन मुलाला मागील सहा महिन्यांपासून सोशल मीडियाद्वारे अश्लील संदेश पाठवत होती. हा प्रकार उघड झाल्यावर मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा अकरावीत शिकतो. नात्यातील एका मुलीने जुलैपासून सोशल मीडियाद्वारे या मुलाला अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. ही घटना संबंधित अल्पवयीन मुलाच्या आईवडिलांच्या लक्षात आली. तसेच युवतीने या मुलाकडून अडीच हजार रुपये आणि काही वस्तू मागितल्या होत्या. तसेच धमकीही दिली होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव करत आहेत