भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून राहुल जयकर.
यावल दि.१२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
सोमवार दि.१० मार्च २०२५ रोजी जळगाव येथील पद्मालय गेस्ट हाउस मध्ये भीम आर्मी भारत एकता मिशन पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून यावल तालुक्यातील राहुल लक्ष्मण जयकर यांची नियुक्ती सर्वांना मते करण्यात आली
भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष लोकसभा खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जळगाव जिल्हा प्रमुख गणेश भाई सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पद्मालय गेस्ट हाउस जळगाव येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत खालील प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या सरदार बलदार तडवी – जिल्हा उपाध्यक्ष
फिरोज अब्बास तडवी – जिल्हा सचिव राहुल लक्ष्मण जयकर- जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी
प्रबुद्ध खरे,संदीप सपकाळे,जावेद शेख,हेमराज भाऊ तायडे,जुम्मा तडवी,राहुल निंभोरे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.