भुसावळात रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला जबर मारहाण करीत रोकड लांबविली !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रस्त्याने पायी जात असलेल्या शहरातील ४० वर्षीय तरुणाला अज्ञात दोघांनी मारहाण करत त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड व १४ हजाराचा मोबाईल लांबवल्याचा प्रकार २५ मार्चला रात्री ११ वाजता घोडेपीरबाबा दर्याजवळ घडला होता. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,शहरातील शिरपूर कन्हाळा रोडवर मनोज रामचरण शर्मा (वय ४०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. २५ मार्चला रात्री ११ वाजेच्या सुमारास मनोज शर्मा हे शहरातील नाहाटा चौफुली येथून घरी पायी जात होते. दरम्यान, घोडेपीर बाबा दर्गाजवळ अज्ञात दोघांनी त्यांना अडवून मारहाण करत त्यांच्या खिशातील १४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि दोन हजारांची रुपयांची रोकड लुटून नेली. या प्रकरणी मनोज शर्मा यांनी २ एप्रिलला रात्री १०.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यत आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोळी करत आहे. दरम्यान, संशयितांचा कसून शोध सुरू आहे.