Monday, April 28, 2025
Homeजळगावयावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचेकडे महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने निवेदन दिले.

यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचेकडे महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने निवेदन दिले.

यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचेकडे महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने निवेदन दिले.

लवकरच कारवाई करणार तहसीलदार यांचे आश्वासन.

यावल दि.१५  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचेकडे महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने निवेदन दिले असता तहसीलदार नाझीरकर यांनी लवकरच पुढील कार्यवाही करण्याचे निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत उपस्थित सर्वांनी समाधान व आभार व्यक्त केले.

पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत मिळत असून जिल्हा तहसील कार्यालयात शेतरस्त्या संबंधात गांभीर्य निर्माण करत गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेतरस्त्यांसाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटनाअन्नदात्याच्या पाठीशी उभे राहत आहेत यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राजव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले यावेळी रावेर शिव पानंद शेतरस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर यावल तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी प्रशासनाला शेतरस्त्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देणार असून शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात येतील शेतकऱ्यांनी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांचा सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरदभाऊ पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्याकडून चळवळीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात आले यावेळी यावल तालुका शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे सचिन चौधरी,भगवान पाटील,विजय पाटील,अविनाश पाटील,गणेश पाटील,जितेंद्र पाटील,पंढरीनाथ पाटील,अरुण चौधरी, देवेंद्र जैन, सतीश पाटील, आर.ई.पाटील सर किनगाव यांसह असंख्य शेतकरीमोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने जनजागृती जनआंदोलन न्यायालयीन लढयाला बळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्याव्यथा समजून घेत तहसिलदारांनी घेतलेल्या परिवर्तनवादी निर्णयाने तालुका सुजलाम सुफलाम होईल याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा – शरदभाऊ पवळे/ दादासाहेब जंगले पाटील ( महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ)

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या