Tuesday, April 29, 2025
Homeजळगावराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची शिक्षण संकल्पना...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची शिक्षण संकल्पना रूजवणारे – डॉ कापडे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची शिक्षण संकल्पना रूजवणारे – डॉ कापडे

यावल दि.९  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयात नविन शैक्षणिक धोरण २०२० या संदर्भात शाळेत मुख्याध्यापक जी डी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ सुधीर कापडे यांनी सांगितले की भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नविन शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षण रचनेत १०+२ च्या प्रणाली ऐवजी ५+३+३+४ ह्या शिक्षण प्रणाली बद्दल माहिती सांगून श्रेयांक पध्दती स्वीकारली आहे.तसेच नविन शैक्षणिक धोरण हे पुरातन शिक्षण पध्दती आणि आधुनिक शिक्षण पध्दती यावर विस्तृत मार्गदर्शन केले.विद्यार्थांना आता स्थानिक भाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक जी.डी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याच्या स्पर्धात्मक युगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी कौशल्ययुक्त शिक्षण उपयुक्त आहे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला प्रा.इम्रान खान,डॉ.नरेंद्र महाले,श्रीकांत जोशी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते ९ वी १० वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या