Thursday, March 27, 2025
Homeजळगाववरणगांव येथे पाणी व रस्त्यासाठी जगनभाऊ सोनवणे यांचे आक्रोश आंदोलन

वरणगांव येथे पाणी व रस्त्यासाठी जगनभाऊ सोनवणे यांचे आक्रोश आंदोलन

वरणगांव येथे पाणी व रस्त्यासाठी जगनभाऊ सोनवणे यांचे आक्रोश आंदोलन

वरणगांव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ) वरणगाव येथे पाणी पुरवठा सुरळीत व्हावा व रस्ते करावे यासाठी संविधान आर्मी व इतर दहा संघटना तर्फे जगन भाऊ सोनवणे व माजी नगरसेविका पुष्पाताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील आक्रोश आंदोलन करण्यात आले .
याप्रसंगी तिरंगा चौकापासून रेल्वे स्टेशन पर्यंत मोर्चा नेण्यात आला . यावेळी वरणगावकरांना नियमित पाणी द्या व रस्ते दुरुस्ती करा ,संजय सावकारे नापास आमदार असल्याने राजीनामा देण्या बाबत च्या घोषणा देण्यात आल्या होत्या .

 


त्यानंतर रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर मोर्चा आरपीएफ व स्थानिक पोलिसां तर्फे आडविण्यात आला व स्टेशन मास्तर यांना निवेदन देण्यात आले तसेच जगन सोनवणे व सहकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते .
तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनासुद्धा आणि नियमित सोडण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे .
आंदोलन यशस्वीतेसाठी राकेश बग्गन, अनिल सुरवाडे ,सगीर शहा , हरीष सुरवाडे ,अशपाक शहा , दीपक तायडे , गौतम गायकवाड , सुरेश इंगळे , भोला इंगळे , एजाज शहा, प्रकाश सुरवाडे , रवींद्र पाटील ,आशिष तायडे आदींनी परिश्रम घेतले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या