वरणगावला महात्मा फुले बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
वरणगाव – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले बहुउद्देशी विकास संस्थेतर्फे आज 3 जानेवारी शुक्रवार रोजी संस्थेच्या कार्यालयात स्त्री शिक्षणाच्या मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांतर्फे अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष संतोष माळी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी आणि कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. प्रमुख अतिथी गणपती हॉस्पिटलचे डॉ. पंकज पाटील, डॉ. हर्षाली पाटील यांच्या हस्ते सुरवातीला प्रतिमेचे करण्यात आले. यावेळी माळी समाजाचे पंच जे. बी.माळी, शिवसेना उप शहरप्रमुख प्रल्हाद माळी, अविनाश माळी, सामाजिक कार्यकर्त्या कस्तुराबाई माळी, निर्मला जोहरे, रूनाली माळी, सविता वाघ आदीनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.