शासन व प्रकल्प अधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर आदिवासी बांधवांचा विराट मोर्चा.
चोपडा,यावल,रावेर तालुक्यातील हजारो मोर्चामध्ये सहभाग
यावल दि.२४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यातील सावखेडे सिम येथील ग्रामस्थांच्या लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या ६७ ०/० टक्के असल्यावर सुद्धा शासनाने तथा यावल येथील जिल्हास्तरीय असलेले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्यांने आपली निष्क्रियता दाखवीत अनुसूचित क्षेत्राचा दर्जा न दिल्याने आणि तो दर्जा प्राप्त होण्यासाठी चोपडा यावल रावेर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी हजारोच्या संख्येने विराट मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
आज सोमवार दि.२४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सावखेडासिम गावातील व तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या महिला, पुरुष,तरुण मुला मुलींचे आदिवासी नागरिकांनी हजारोच्या संख्येने एकत्र येऊन यावल पंचायत समिती पासून जिल्हास्तरीय असलेल्या यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर भव्य विराट मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आणि आपल्या मागणीची निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सावखेडे सिम ग्रामपंचायत कडून सन २०११ क्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ५ हजार ६४३ एवढी असून त्यापैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३ हजार ७८८ इतकी आहे एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या ६७.१२, ०/० टक्के आहे.
सन २०१४ यावर्षी महाराष्ट्र शासनाने पेसा कायदा अंतर्गत कायदा लागू करणे संदर्भात नियम / राजपत्र प्रकाशित केलेले असताना सुद्धा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथून सन २०१४ ते सन २०२२ या आठ वर्षाच्या कालावधीत यासंबंधी राजनियम ग्रामपंचायत यांना कोणतेही पत्रव्यवहार केलेले नाही व या काळात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी स्वतः सावकडे सीम गावाचा या आठ वर्षाच्या काळात ( अनुसूचित क्षेत्र / पेसा क्षेत्र ) चा दर्जा दिला नाही,यासाठी यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने सुद्धा काही सक्रिय अशा हालचाली केल्या नाही. महाराष्ट्र शासनाने पेसा कायदे संबंधित बनविलेले नियमामधील पूर्ण योग्यता असून सुद्धा यावल तालुक्यातील सावखेडेसीम गाव हे पेसा कायद्यापासून वंचित आहे.
ही बाब २०२२ या वर्षात चोपडा,यावल,रावेर तालुक्यातील आदिवासी समाजातील रहिवाशांच्या लक्षात आली तेव्हा या समाजातील नागरिकांनी यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे धाव घेतली आणि जे काम सन २०१४ साली अमलात यायला पाहिजे ते सन २०२२ वर्ष सुरुवात झाले आणि मार्च २०२५ वर्ष सुरू झाले तरी संबंधित विषयात आदिवासी संशोधन संस्था आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांच्याकडून कोणतेही निर्णय व उत्तर न मिळाल्याने
( २०१४ ते २०२५ ) एवढा अकरा वर्षाचा संयम सोडून दि.२४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने पंचायत समिती आवारात एकत्र येऊन तेथून भव्य असा मोर्चा काढून यावल येथील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले.
ठिय्या आंदोलन तथा मोर्चाचे नेतृत्व आणि निवेदनावर स्वाक्षरी करणार सावखेडा सिम येथील उपसरपंच, मुबारक सुभेदार तडवी, अकबर हबीब तडवी,साकीर मुबारक तडवी,शाहीद जहांगीर तडवी,तडवी,सलीम इस्माईल तडवी, मुस्तफा रमजान तडवी इत्यादी प्रमुख आदिवासी बांधवांची स्वाक्षरी केली आहे.आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी काय निर्णय घेतात आणि आदिवासी बांधवांना काय आश्वासन देतात..? याकडे संपूर्ण आदिवासी बांधवांचे लक्ष लागून आहे.