सदगुरू झेंडूजी महाराज यांची पुण्यातिथी संपन्न
श्री महालक्ष्मी ग्रुप, भुसावळ. तर्फे सालाबादाप्रमाणे दिनांक २७/१२/२०२४, शुक्रवार, आपण आपले आद्य गुरु वारकरी संप्रदायाची प्रणेते श्री सद्गुरू झेंडूजी महाराज (बेळीेकर) यांची १४६ वी पुण्यतिथी ,खान्देशात सर्व प्रथम वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ ज्यांनी रचली असे *सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर* यांची १४६ वी पुण्यतिथी*, साजरी करण्यात आली आहे .
४५ वर्ष वारकरी संप्रदाय च्या प्रचार प्रसाराचे पवित्र निष्काम कर्म करीत बरोबर १४६ वर्षापूर्वी मार्गशीर्ष वद्य द्वादशी दिनांक २१/१२/१८७८ शनिवार रोजी *श्रीक्षेत्र कोथळी येथे आदिशक्ती आईसाहेब मुक्ताई च्या चरणी सद्गुरूंनी देह ठेवला होता
अशा या सद्गुरूंची पुण्यतिथी साजरी करण्याचे हे आपले समाज मंडळाचे १० वे वर्ष आपण मोठ्या भक्ती भाव, आनंदाने व उत्साहाने साजरे करण्यात आले आहे,
याप्रसंगी समाज मंडळाचे सदस्य,श्री महालक्ष्मी ग्रुप सदस्य तसेच भोरगाव लेवा पंचायत चे कुटुंबनायक श्री ललित दादा पाटील व मान्यवर समाज बांधवांनी उपस्थिती दिली होती
या कार्यक्रमात श्री सुधीर दादा पाटील व मंडळाचे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी महाराजांच्या जीवनक्रम व त्यांचे आध्यात्मिक कार्य विशद करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री प्रकाश पाटील, मधुकर लोखंडे, अभिषेक पाटील, नितीन लोखंडे, धर्मराज देवकर, जगदीश फिरके, धीरज पाटील, दीपक झांबरे, अरविंद कुरकुरे, किशोर पाटील, मुरलीधर लोखंडे, लीलाधर भारंबे, संजय बर्हाटे, राजेंद्र वाघोदे, चंद्रकांत पाटील, प्रल्हाद नेहते व यशवंत महाजन हे मान्यवर उपस्थित होते.