Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाहॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की ; एकावर गुन्हा दाखल !

हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की ; एकावर गुन्हा दाखल !

हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की ; एकावर गुन्हा दाखल !

धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भावाच्या आजारासाठी व्याजाने घेतलेले पैसे चेकद्वारे व ऑनलाइन परत केले तरीसुद्धा हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना धरणगाव येथे घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, धरणगाव येथील अवधेश वाजपेयी यांनी पोलिसात तक्रार दिली असून, त्यात म्हटले आहे की, त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. मोठे बंधू आशिष वाजपेयी हे कॅन्सरने आजारी होते. भावाच्या उपचारासाठी त्यांनी जी. एस. लॉन्सचा पार्टनर व व्याजाचा व्यवसाय करणारा सुनील पंढरीनाथ चौधरी (कोर्ट बाजार, धरणगाव) याच्याकडून ५ वर्षांपूर्वी सावकारी टक्केवारी व्याजाने रोख ५ लाख रुपये घेतले होते. नोव्हेंबर २०२३मध्ये त्यांचा मोठा भाऊ आशिष वाजपेयी हे उपचार घेत असताना मयत झाले. त्यानंतर त्यांचा पुतण्या लक्ष वाजपेयी व अवधेश वाजपेयी यांनी हॉटेल व्यवसाय करून सुनील चौधरी याच्याकडून घेतलेले पाच लाख रुपये व्याजासह वेळोवेळी परत केले. तरी ६ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास सुनील पंढरीनाथ चौधरी याने त्यांच्या हॉटेलसमोर येऊन व्याजाच्या पैशाची मागणी केली. या वादातून सुनील चौधरी याने शिवीगाळ केली आणि धक्काबुक्कीही केली. या प्रकरणी अवधेश वाजपेयी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव स्थानकात सुनील चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि संतोष पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या