Tuesday, April 29, 2025
Homeजळगावआमदार अमोलदादा जावळे यांच्या नेतृत्वाखाली राजोरा येथे भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट टूर्नामेंट...

आमदार अमोलदादा जावळे यांच्या नेतृत्वाखाली राजोरा येथे भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट टूर्नामेंट २०२५ संपन्न.

आमदार अमोलदादा जावळे यांच्या नेतृत्वाखाली राजोरा येथे भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट टूर्नामेंट २०२५ संपन्न.

यावल दि.१६   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आमदार अमोलदादा जावळे यांच्या नेतृत्वाखाली यावल तालुक्यातील राजोरा येथे श्रीराम क्रिकेट लीग तर्फे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट टूर्नामेंट २०२५ संपन्न झाल्या
यावल रावेर तालुक्याचे माननीय आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी व माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नितीन व्यंकट चौधरी यांच्या संयुक्त विद्यमानाने हे टूर्नामेंट आयोजित केली होती.
सदर टूर्नामेंटमधे एकूण ३५ सामने खेळवण्यात आले,त्यापैकी अंतिम सामन्यांमध्ये कासवा येथील शिवशक्ती क्रिकेट टीम व राजोरा येथील श्रीराम क्रिकेट टीम अशा दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला सदर अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा झाला त्यामध्ये कासवा येथील टीमने विजेते पद राखलं तर उपविजेते पद राजोरा येथील श्रीराम टीमने राखलं
अंतिम सामन्याच्या वेळी आयोजक सागर कोळी व नितीन व्यंकट चौधरी हे उपस्थित होते त्याच बरोबर सांगवी खुर्द येथील दिगंबर कोळी,आकाश धनगर,संजय धनगर,राजोरा येथील मधुकर नारखेडे,कल्पेश पाटील,चेतन पाटील,बापू कोळी व अन्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बक्षीस वितरणामध्ये आमदार अमोलदादा जावळे यांनी विजयी संघाचे कौतुक केलं व त्यांना ट्रॉफी व रोख रकमेचे बक्षीस दिले गेले व खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शक्तिकेंद्र प्रमुख मयूर महाजन यांनी केले
सदर संपूर्ण टूर्नामेंट साठी ज्ञानेश्वर उंबरकर व विशाल कोळी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या