कुऱ्हा परिसरात कोंबिंग ऑपरेशन : पाच आरोपीना ठोकल्या बेड्या
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा दूरक्षेत्र अंतर्गत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात हलखेडा येथील २०२३-२४ या काळात दाखल विविध गुन्ह्यातील फरार पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, क्यूआरटी पथक, उपविभागीय पोलिस अधिकारी व मुक्ताईनगर पोलिस स्टेशन यांच्या पाच पथकाने हलखेडा, मधापुरी या गावात दि. १८ रोजी सकाळी पाच आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी पाच पथके नियुक्त केली होती. त्यांनी हा कामगिरी पार पाडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात काळी हळद, पंधरा बिबा, दोन तोंडी साप, डुप्लिकेट नोटा देण्याचे आमिषाने अनेक घटना घडल्या. त्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणांमध्ये या पाचही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत त्यांना अटक केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्यासह पाच पथकांनी ही कामगिरी केली. या प्रकरणातील पाच आरोपींवर खामगाव ता. बुलढाणा येथे मोठे गुन्हे असल्याने त्यांना खामगाव येथे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी दिली.
दरम्यान, आरोपींपैकी समीर हकीम पवार, देश नरवीलाल पवार, हकीम रफिक पवार, निखिल सवलत पवार व योगेश अंजूर पवार सर्व रा. हलखेडा यांचा समावेश आहे. हे आरोपी गेल्या दोन वर्षापासून फरार होते. त्यापैकी चार आरोपींवर मकोका अन्वये कारवाई करण्यात आली आहे.