Sunday, March 16, 2025
Homeगुन्हाडंपर आणि पिकअपचा भीषण अपघात : पिकअप व्हॅनवरील चालकाचा दुर्देवी मृत्यू !

डंपर आणि पिकअपचा भीषण अपघात : पिकअप व्हॅनवरील चालकाचा दुर्देवी मृत्यू !

डंपर आणि पिकअपचा भीषण अपघात : पिकअप व्हॅनवरील चालकाचा दुर्देवी मृत्यू !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथून जवळच असलेल्या कुन्हा पानाचे-मोंढाळा या राज्य मार्गावर राखेचा डंपर आणि पिकअप वाहनाचा अपघात झाला. यात पिकअप व्हॅनवरील चालकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना १७ रोजी दुपारी घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, १७ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास कुन्हा पानाचे ते मोंढाळा गावादरम्यान विजय कोळी यांच्या शेतासमोर पिकअप वाहन (एम. एच. १९/ सी. वाय. ८०४९) व राखेचा डंपर (एम. एच. १९/ झेड. ३९४३) यांचा अपघात होऊन पिकअप चालक भावसिंग रामदास पवार (रा. धानोरी, ता. बोदवड) यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या सोबत असलेले प्रवीण संजय जाधव, अजय आनंदा बेलदार हे गंभीर जखमी झाले. याबाबत ईश्वर संजय जाधव यांनी फिर्याद दिल्यावरून भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नंदकुमार काळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या