दिपनगर येथे प्रकल्पग्रस्त शेतकरी पुर्नवसन समिती आंदोलन करणार
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दिपनगर प्रशासन प्रकल्पग्रस्ता बाबत दक्षता घेत नसल्याने प्रकल्प ग्रस्त शेतकरी समिती आंदोलन करणार असल्याचे पत्रक अध्यक्ष प्रभाकर सोनवणे व सुभाष झांबरे यांनी केले आहे .
प्रकल्प ग्रसतांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत .
1) प्रशासकीय परिपत्रक क्र.५२८ दिः २२/०८/२०२३ या परिपत्रकाप्रमाणे प्रकल्प बाधितांना समावून घेण्याबाबत
२) ०३/०६/२०१०, १३/१२/२०१०, २८/०२/२०११, ११/०९/२०१८ या प्रमाणे जुन्या प्रमाणित प्रकल्पग्रस्तांना ४०+४० प्रशिक्षणार्थी समावून घेण्याबाबत.
३) १x६६० च्या रेल्वे स्लाईडिंग साठी संपादित झालेल्या जमिनी वरील प्रकल्पग्रस्तांना Civil Diploma व MCA ची जागा त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबत.
या प्रमाणे मागण्या असून प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी पुढील आंदोलने दीः ११/०३/२०२५ शेतकन्यांनी रेल्वे साठी दिलेल्या जमिनीवर सकाळी १० वाजेपासून ठिय्या आंदोलन दीः १२/३/२०२५ रोजी सकाळी 10 वाजेपासून कोळसा वाहतूक थांबविण्यात येणार आहे. दि १३/३/२०२५ रोजी १/६६० च्या गेटसमोरील नॅशनल हायवे ६ वर सकाळी 10 वाजेपासून रस्ता रोको शांतमय पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे स्थानिक परिसरातल प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधितांच्या परिवारासहीत आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन समिती करणार आहे.