Monday, March 24, 2025
Homeगुन्हाधनादेशाचा अनादरप्रकरणी आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा !

धनादेशाचा अनादरप्रकरणी आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा !

धनादेशाचा अनादरप्रकरणी आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – धनादेश अनादर केल्याप्रकरणी आरोपीला ३ महिने कारावास आणि धनादेशाच्या दुप्पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश येथील तिसरे सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. आर. बागडे यांनी दिलेत.

याबाबत वृत्तांत असे की, या संदर्भात आरोपी राजू भिकन मिस्त्रीवर यावर चलनक्षम पत्रकाच्या कायद्याअंतर्गत फिर्याद दाखल होती. दरम्यान, राजू भिकन मिस्त्री याने भुसावळ येथीलपुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को-आप सोसायटी या | संस्थेकडून ४० हजारांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड म्हणून आरोपी मिस्त्री यांनी संस्थेला ३० हजारांचा धनादेश दिला होता. या धनादेशाचा अनादर झाल्यावर संस्थेने आरोपीला नोटीस देऊन अनादरीत धनादेशाच्या रकमेची मागणी केली होती. परंतु, भिकन मिस्त्रीने मुदतीत रक्कम दिली नाही.
त्यामुळे संस्थेने मिस्त्रीविरुद्ध चलनक्षम पत्रकाचा कायदा कलम १३८ प्रमाणे फौजदारी खटला दाखल करुन न्यायालयात दाद मागितली. या खटल्याची सुनावणी सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. आर बागडे यांच्या समक्ष पूर्ण झाली. यात साक्षीदार अविनाश मनोहर काळे यांनी फिर्याद दिली होती. संस्थेतर्फे अॅड. नीलेश सुरेश भंडारी यांनी काम पाहिले. उपलब्ध साक्षी अन् पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने राजू भिकन मिस्त्री यास दोषी ठरवले. तसेच धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणजे ६० हजारांची नुकसानभरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास ३ महिने साध्या कैदेचे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या