Monday, March 24, 2025
Homeजळगावपरसबाग स्पर्धेत यावल तालुक्यातील शिरसाड येथील प्राथमिक जि.प.शाळेला घवघवीत दुहेरी यश.

परसबाग स्पर्धेत यावल तालुक्यातील शिरसाड येथील प्राथमिक जि.प.शाळेला घवघवीत दुहेरी यश.

परसबाग स्पर्धेत यावल तालुक्यातील शिरसाड येथील प्राथमिक जि.प.शाळेला
घवघवीत दुहेरी यश.

यावल दि.१३   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
परसबाग स्पर्धेत यावल तालुक्यातील शिरसाड येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेला घवघवीत दुहेरी यश मिळाले
यावल तालुक्यात तसेच जिल्हा स्तरीय शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयोजित शालेय परसबाग स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून,जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांकाने गौरवांकित होण्याचा मान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिरसाड या शाळेने पटकावला आहे.प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत शाळांमध्ये पोषण आहारासाठी ताज्या भाज्यांचा समावेश करण्यासाठी परसबागा विकसित करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
शिरसाड शाळेच्या या यशामध्ये वरिष्ठ शिक्षक राजाराम मोरे यांचे विशेष योगदान लाभले असून शिवदास महाजन सर यांनी परसबागेची विशेष देखभाल केली. ग्रामस्थ दगडू तडवी,विश्वनाथ धनगर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले तसेच म.ग्रेडेड मुख्याध्यापक रविंद्र शामराव पाटील,संपूर्ण शिक्षक स्टाफचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेच्या निकालानुसार शिरसाड शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आणि जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.तालुका स्तरावर प्रथम क्रमांक-परसबाग सन-२०२२-२३, २०२३-२४ व २०२४- २०२५ सलग तीन वर्ष या उल्लेखनीय यशाच्या निमित्ताने.उपशिक्षणाधिकारी सानप मॅडम,यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके साहेब,सचिन मगर साहेब- अधिक्षक शा.पो.आहार योजना.पं.स.यावल.व किशोर चौधरी -केंद्रप्रमुख साकळी यांनी शाळेस भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.त्यांनी सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या परसबागेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल कौतुक करत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.या दुहेरी यशाबद्दल शाळेतील शिक्षक,विद्यार्थी आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापनाचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या