Wednesday, March 26, 2025
Homeजळगावभुसावळात गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयीताला अटक

भुसावळात गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयीताला अटक

 भुसावळात गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयीताला अटक ! 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहर पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयीताला अटक केली आहे. जगन धर्मा कोळी (वय ४४) अयोध्या नगर, भुसावळ जि. जळगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अटकेत असलेला आरोपी व्यवसायाने प्लंबर आहे. संशयीताला अटकेनंतर न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांना संशयीत जगनकडे कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. हवालदार नेव्हील बॉटले, सहायक फौजदार संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी संशयितांकडून १० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे. दरम्यान, सदर ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी दुपारी ०४:०० वाजता करण्यात आली आहे.
सदर, तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या