Sunday, April 27, 2025
Homeजळगावमुक्ताईनगर हिरो दुचाकी शोरूम वरती आरटीओ अधिकाऱ्यांनी टाकला छापा

मुक्ताईनगर हिरो दुचाकी शोरूम वरती आरटीओ अधिकाऱ्यांनी टाकला छापा

खान्देश लाईव्ह न्यूज वृत्ताची दखल!

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात बेकायदा बिना परवाना दुचाकी विक्री संदर्भात सर्वात प्रथम खान्देश लाईव्ह वृत्त कडून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या वृत्ताची दखल घेत आरटीओ यांनी विनापरवाना दुचाकी शोरूमवर अचानक धाड टाकून चौकशी व कारवाई केल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर शहरात विना परवाना दुचाकी विक्री सुरु असताना त्या संदर्भात सर्वात प्रथम खानदेश लाईव्ह वृत्त ऑनलाइन बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यानंतर इतर सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये वृत्त प्रसिध्द झाले.त्या वृत्ताची दखल घेत मुक्ताईनगर शहरा मध्ये असलेल्या हिरो कंपनीचे दुचाकी शोरूम ओम श्री मोटर्स या नावाने चालत असलेल्या शोरूम मध्ये RTO विभागाने अचानक छापा टाकून चौकशी व कारवाई केली.

याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी आणखी काय कारवाई केली विचारणा केली असता चौकशी पूर्ण झाल्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले,परंतु सायंकाळी कारवाईचा आढावा घेण्यासाठी असिस्टंट आरटीओ अधिकारी बागडे साहेब यांना कॉल केला असता आरटीओ कर्मचाऱ्यांनी कुठे कुठे कारवाई केली मी त्यांच्याकडून आढावा घेतो व तुम्हाला माहिती देतो असे सांगितले परंतु अद्यापही त्यांनी कुठे कुठे कारवाई केली व मुक्ताईनगर शोरूम मध्ये नेमकी काय कारवाई केली सांगितले नाही.यामुळे जळगाव जिल्ह्यात बेकायदा दूचाकी विक्री कधीपासून आणि कोणाच्या आशीर्वादाने कुठे कुठे सुरू होती आणि आहे आणि काय कारवाई झाली..? याबाबत सर्व स्तरात अनेक प्रश्न उपस्थित होत असून कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या