Tuesday, April 29, 2025
Homeजळगावयावल तालुका कलाध्यापक संघाची सहविचार सभा संपन्न

यावल तालुका कलाध्यापक संघाची सहविचार सभा संपन्न

यावल तालुका कलाध्यापक संघाची सहविचार सभा संपन्न

यावल दि.१०  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील कला शिक्षकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली.
या शैक्षणिक वर्षात चित्रकला प्रदर्शनाबाबत यावल येथील जिनिंग प्रेसिंग सभागृह येथे यावल तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे यांनी सभेला सुरुवात केली सभेत तीन गटांमध्ये चित्रकला प्रदर्शन घेण्याचे ठरले पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी दुसरा गट इयत्ता आठवी ते दहावी तिसरा गट अकरावी बारावी प्रदर्शनासाठी येणाऱ्या अडीअडचणीसाठी अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली या सहविचार सभेसाठी कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष तथा मुख्याध्यापक संजीव बोठे,जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष अजय पाटील,मुख्याध्यापक अतुल गर्गे सचिव संतोष वानखेडे उपाध्यक्ष चंदन भालेराव अनिल वंजारी कार्याध्यक्ष हितेंद्र धांडे सहसचिव कैलास पवार सह ज्येष्ठ कलाशिक्षक पुरुषोत्तम बोबडे विकास चौधरी अतुल महाजन नितीन फेगडे जितेंद्र महाजन कमलाकर कोष्टी हर्षल मोरे रूपाली सोनवणे अनिल झांबरे प्रीतम देशमुख पंकज कुमार भालेराव एस बी तडवी इकबाल तडवीसह तालुक्यातील कलाशिक्षक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या