Monday, April 28, 2025
Homeजळगाववरणगावातील युवकाचा अंकलेश्वर गुजरात येथे अपघातात मृत्यू

वरणगावातील युवकाचा अंकलेश्वर गुजरात येथे अपघातात मृत्यू

वरणगावातील युवकाचा अंकलेश्वर गुजरात येथे अपघातात मृत्यू

१ नववर्षाची पहाट ठरली घातक!

वरणगाव खानश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – वरणगाव :येथील छत्रपती शिवाजी नगर मधील रहिवासी हितेंद्र प्रकाश सोनार 32 हा तरुण अंकलेश्वर गुजरात येथे कंपनीमधे नोकरीस होता कामावर जातांना १ जानेवारी २४ रोजी त्याचा अपघातात मृत्यु झाला त्यामुळे छत्रपती शिवाजीनगरमधे शोककळा पसरली होती.
नोकरीस असलेल्या या युवकाचे एमएससी पर्यंत शिक्षण झाले होते . पाच -सहा वर्षापासुन तो अंकलेश्वर येथिल कंपनी मधे नोकरीला होता . वरणगाव येथे वृद्ध आई-वडिल मजुरी करून उदरनिर्वाह करीत असतांना तो त्यांना अंकलेश्वर गुजरात येथे घेऊन गेला ‘तेथेच नोकरी करुन त्या व्यतिरिक्त फावल्या वेळेत तो फर्निचरची कामे करीत होता अशाप्रकारे रात्रंदिवस मेहनत करून त्याने तेथे घरसुद्धा घेतले होते , अडीच वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला असुन त्याला दिड वर्षाची मुलगी सुद्धा आहे . अशा प्रकारचा सुखाचा संसार सुरु असतांना त्याच्या संसाराला दृष्ट लागली .व दिनांक १जानेवारी २४ रोजी नेहमीप्रमाणे घरातून सहा वाजता आपल्या नोकरीच्या ठिकाणी दुचाकीने जात असताना घरापासून काही अंतरावर मुख्य हायवे रस्त्यावर त्याच्या दुचाकीला समोरून अज्ञात वाहनाने धडक दिली त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता परंतु रस्त्यावरील कोणीही त्याला मदत न केल्यामुळे तो त्याच ठिकाणी दीड तास पर्यंत पडून राहिल्यामुळे त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव होऊन तो जागीच गतप्राण झाला . त्याच्या आई-वडिलांना ही वार्ता तब्बल दिड तासांनी कळाल्यावर ते अपघातस्थळी गेले त्यावेळी तो आपल्या दुचाकीसह जोमदार वाहतुक असलेल्या महामार्गावर पडलेला दिसला तेथे जाऊन आई-वडिलांनी त्याचे तोंडावरील रक्त वगैरे पुसुन साफ केले व आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी हाक दिली परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याच्या मदतीला कोणी धावून आले नाही . शेवटी तेथे राहात असलेले वरणगाव येथील महेंद्रसिंग राऊळ व त्यांचा मुलगा अमर राऊळ यांना घटना कळाल्याबरोबर ते अपघात स्थळी मदतीला धावून गेले तोपर्यंत वेळ निघुन गेली होती . त्याला इस्पितळात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले . त्याचा मृतदेह वरणगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत आणण्यात आला.
घरातील एकुलता एक मुलगा एवढ्या तरुण वयात गेल्यामुळे आई-वडिलांसह त्याची पत्नी ‘काका व चुलत्यांवर तसेच बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता . रात्रीच्या वेळेस जेव्हा प्रेत घरी आणले तेव्हा त्या ठिकाणचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता , त्याची १२ वर्षाची चुलत बहिण हे दृश्य बघुन बेशुद्ध पडली होती . तर पत्नीची स्थिती वेडया सारखी झाली होती .त्याचे पश्चात वयस्कर आई-वडील ‘ पत्नी , दिड वर्षाची मुलगी बहीण काका काकू चुलते असा परिवार असून घरातील हरहुन्नरी कमावता मुलगा गेल्याने ते एकुलत्या मुलाला पोरके झाले आहेत . त्याचे वर रात्री साडेबाराचे सुमारास वरणगाव येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या