सुसाईट नोट लिहत कंत्राटी कर्मचाऱ्यांने केली आत्महत्या!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जि. प.च्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील (डीआरडीए) कंत्राटी कर्मचारी अनिल हरी बडगुजर (४६, रा. वाघनगर) यांनी आत्महत्या केल्याची घटना २७ रोजी रात्री वाघनगरात घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, अनिल बडगुजर हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात बचतगट विभागात कंत्राटी पध्दतीने काम करायचे. सोमवारी रात्री वाघनगर येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेतला. तत्पूर्वी त्यांनी ‘सुसाइड नोट’ लिहून आई वडील व भावाच्या मोबाइलवर पाठविली. त्यात त्यांनी कार्यालयात कोणा-कोणाकडून कसा त्रास दिला जात होता, याचा उल्लेख केला आहे. अनिल बडगुजर यांना गेल्या दोन वर्षांपासून कार्यालयातील महिला विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होत्या. तसेच स्थानिक समितीमध्ये त्यांच्या विरोधात तक्रारही केली होती. त्यामुळे अनिल बडगुजर हे गेले काही दिवसांपासून त्रस्त होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.