Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हासोनबर्डी येथे जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू !

सोनबर्डी येथे जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू !

सोनबर्डी येथे जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू !

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सोनबर्डी टेकडीच्या तळाशी असलेल्या जलतरण तलावात बुडून संकेत निवृत्ती गवांडे (पाटील) (१५, रा. हिवरखेडे रोड, जामनेर) याचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
जलतरण तलावात एका मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची माहिती सोशल मीडियावर होती. यावरून ही घटना पुढे आली. जालमसिंग राजपूत यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. संकेत हा घोसला, ता. सोयगाव येथील राहणारा असून तो व त्याचा मोठा भाऊ शिक्षणासाठी आजीकडे जामनेरला आले. येथील शाळेत तो आठवीत शिकत होता. जलतरण तलाव काही दिवसांपासून बंद होता, मात्र त्यात नुकतेच पाणी सोडल्याचे सांगण्यात आले. नगरपालिकेने तलाव बांधला आहे. मात्र, या घटनेमुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेने शहर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या