महिलेची बदनामी करणारे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील स्वरूप कॉलनी सर्व्हे नंबर २९५/२ घर नंबर ४ मधील रहिवाशी या महिलेस अश्लील शिवीगाळ करीत समाजाच्या तसेच वैय्याक्तिक व्हाट्सअप ग्रुपवर गजानन सखाराम खानजोडे राहणार बोरगाव काकडे. चिखली जि. बुलढाणा,रमाकांत प्रभाकर श्रीरसागर राहणार जुना कुंभारवाडा कांजिळी, नाशिक,चंद्रशेखर कडू कापडे राहणार मायादेवी स्टॉप शेजारी जळगांव,बबन काशीराम जगदाळे राहणार शेवंताई निवास बस स्टँड मागे नवापूर जि. नंदुरबार अशांनी ता.१९/२/२०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मेसेज व्हायरल करून बदनामी केली.म्हणून भुसावळ शहर पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील महिलेचे पती हे सैनिक ते सध्या कारगिल बॉर्डर वर कार्यरत आहेत.यांचे पत्नी यांनी चौघांविरुद्ध पोलीस स्टेशन तक्रार दिलीअसून मा.न्यायालयात एक एक इसम रतीलाल बन्सीलाल कुंभार राहणार शिरपूर टेक,जि. धुळे असे पाच जणांविरुद्ध न्याय मिळण्यासाठी मे.ज्यूडी मॅजि.वर्ग -१ सो।यांचे न्यायालयाकडे धाव घेत प्रकरण २९/३/२०२५ रोजी दाखल केले आहे.